समाज जोडण्यासाठी संतांना डोक्यावर नाही, डोक्यात घ्यावा :-
भाग्यवान खोब्रागडे
आरमोरी :-प्रत्येक समाज जाती मध्ये संत होऊन गेले, प्रत्येक संतानी आपले विचार,उपदेश समाजात मांडले आहेत, समाजात टिकण्यासाठी समाज संघटन आवश्यक आहे, आज समाज विखुरला जात आहे,, संताजी जगनाडे महाराज यांचे विचार हे आजच्या जीवनात आचरण करणे काळाची गरज आहे, त्याकरिता संतांना डोक्यावर नाही तर डोक्यात घ्यावा असे प्रतिपादन किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाग्यवान खोब्रागडे यांनी आरमोरी येथे झालेला तेली समाज मेळ्याव्यात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते
आरमोरी येथे काल रविवारी संताजी ग्राउंड येथे श्री संताजी बहूउद्वेशीय सेवा मंडळ आरमोरी द्वारा आयोजित तेली समाज मेळावा व श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी, ज्येष्ठांचा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा व प्राविण्य प्राप्त गुण गौरव सोहळा रविवार, 'संताजी ग्रॉऊन्ड' कोसा विकास जवळ वडसा रोड, आरमोरी येथे पार पडले, यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. भाग्यवानजी खोब्रागडे अध्यक्ष श्री किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्था आरमोरी, हे होते , कार्यक्रमाचे उद्घाटक योगीताताई भांडेकर माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद, गडचिरोली, योगीताताई पिपरे माजी नगराध्यक्ष नगर परिषद गडचिरोली होते,प्रमुख अतिथी म्ह्णून बबनराव फंड अध्यक्ष महाराष्ट्र तेली समाज महासंघ, बुध्दाजी किरमे अध्यक्ष तेली समाज आरमोरी, प्रमोदजी पिपरे जिल्हा अध्यक्ष, म.रा.प्रांतिक तेली समाज महासंघ,परसराम टिकले माजी सभापती प.स.वडसा, प्रभाकरजी वासेकर सदस्य, म.रा.प्रांतिक तेली समाज महासंघ,प्राचार्य पी. आर. आकरे साईनाथ कनिष्ठ महाविद्यालय, मालेवाडा, मुखरूजी खोब्रागडे अध्यक्ष, तेली समाज वैरागड,भाष्करराव बोडणे उपसरपंच ग्रामपंचायत, बाबुरावजी कोहळे जेष्ठ भाजपा नेते, डॉ. संजय सुपारे भेषज अधिकारी प्रा. आ. केन्द्र देलनवाडी, विलास समर्थ, भाग्यलक्ष्मी खोब्रागडे, भैय्याजी सोमनकर अध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तेली पतसंस्था गडचिरोली, अनिखा क्षीरसागर, अल्का जौजालकरआदी उपस्थित होते, पुढे बोलताना खोब्रागडे म्हटले समाजाला एकत्रित करण्याकरीता समाज मेळावे घेणे आवश्यक आहे, यावेळी योगिता भांडेकर यांनी उद्घाटनिय भाषणात म्हटले की समाजात पुढे जाणाऱ्या व्यक्तीला प्रोत्साहन करण्याची गरज आहे, समजतील गरीब घटकाला मदत करण्याकरिता पुढेयेणे हे सर्वात आजचे समाज हित आहे, कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी समाज हितावर मार्गदर्शन केले, कार्यक्रमात समाजातील नागरिक व सेवानिवृत्त कर्मचारी यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देवुन सत्कार करण्यात आला. तसेच समाजातील इयत्ता दहावीत , बारावित तसेच शैक्षणिक क्षेत्रात प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
व मेळाव्याला उपस्थित वधु वराचा परीचय मेळावा घेण्यात आला. श्री संताजी बहूउद्वेशीय सेवा मंडळ आरमोरी द्वारा सन २०२२ चा दिनदर्शिका चा विमोचन करण्यात आले
कार्यक्रम यशस्वी ते साठी तेली समाज चे उपाध्यक्ष रामभाऊ कुर्झेकर, सचिव देविदास नैताम, सहसचिव श्री तुळशिरामजी चिलबुले सेवानिवृत्त नायब तहसीलदार, कोषाध्यक्ष श्री विवेक घाटूरकर , आकाश चिलबुले, नगर परिषद पाणीपुरवठा सभापती विलास पारधी, गंगाधर जुआरे, गजानन चिलगे,नगर सेवक मिलिंद खोब्रागडे,विलास चिलबुले, विजय सुपारे, रवींद्र निंबेकर, हरीश बावनकर,रवींद्र सोमनकर, सदाशिव भांडेकर, द्वारकाप्रसाद सातपुते, महीला कमिटीच्या हिराबाई कामडी, प्रतिभा जुआरे, सुरेखा भांडेकर,
रूपेश जवंजालकर, प्रफुल्ल मोगरे, शुभांगी भाडेकर यांनी अथक परिश्रम घेतले.
प्रास्ताविक श्री . व्दारकाप्रसाद सातपुते यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन प्रा, डॉ, प्रदीप चापले यांनी केले तर आभार रविंद्र सोमनकर यांनी केले . यावेळी परिसरातील जास्तीत जास्त संख्येने तेली समाज बांधव उपस्थित होते