तेली समाजाला जागृत करण्यासाठी युवक-युवतींनी पुढाकार घ्यावा- माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे*



News Description

तेली समाजाला जागृत करण्यासाठी युवक-युवतींनी पुढाकार घ्यावा- माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे* *आरमोरी येथे तेली समाज मेळावा, गुणवंत विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार* आरमोरी :- दि. 9 जाने. *तेली समाज गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे मात्र आपले समाज बांधव एकत्र येत नसल्याने अनेक कामे होऊ शकत नाही समाजाला जागृत होऊन एकत्र येणे गरजेचे असून त्याशिवाय समाजाचा विकास होऊ शकत नाही तसेच ओबीसींचे प्रश्न सुद्धा सुटू शकत नाही त्यामुळे समाज बांधवांनी एकत्र येऊन ओबीसी समाजाच्या समस्यां व अडचणीसाठी जागृत होणे आवश्यक आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका , संघटीत व्हा आणि संघर्ष करा असा नारा दिला होता त्यांचे विचार अंगीकारून समाजाला संघटीत होण्याची गरज असून आजच्या तरुण पिढीने चांगले शिक्षण घेऊन समाजाला चांगला मार्ग दाखवणे आवश्यक असून समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांनी केले. आरमोरी येथे आयोजित तेली समाज वधू-वर परिचय मेळावा तसेच ज्येष्ठ नागरिक व सेवानिवृत्त कर्मचारी व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात उद्घाटनाप्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.* *श्री संताजी बहुउदेशीय सेवा मंडळ आरमोरी यांचे सौजन्याने दिनांक ०८ जाने.२०२३ रोजी संताजी ग्राउंड कोसा विभाग केंद्राजवळ आरमोरी येथे तेली समाज वधु वर परीचय मेळावा तथा तेली समाज मेळावा व गुणवंत विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सत्कार कार्यक्रम पार पडला.* *मेळाव्याचे उदघाटन माजी नगराध्यक्ष सौ योगीताताई पिपरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाग्यवानजी खोब्रागडे होते तर सत्कार मूर्ती म्हणून संताजी सोशल मंडळ, ब्रम्हपुरीचे अध्यक्ष डॉ सतीश कावडे, प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र.प्रा.तेली समाजाचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद पिपरे, ,तेली समाज करीता जागा उपलब्ध करून दिला असे समाजाचे अध्यक्ष श्री बुधजी किरमे, पी.आर.आखरे,परशराम जी टिकले,भास्करराव बोडणे,गोपीचंद चांदेवार,अशोक कुरजेकर ,मिलिंद खोब्रागडे, ,सुनीता चांदेवर, निर्मला किरमे,रामभाऊ कुरजेकर,दत्तू सोमनकर,वीज वितरण कंपनी आर.रविकांत वैद्य,जिला मध्यवर्ती सहकारी बँक भोजराज चांदेवार सेवानिवृत्त नायब तहसीदार,योगेंद्र चापले सौ भाग्यलक्ष्मी खोब्रागडे आदी तेली समाज मान्यवर प्रामुख्यानेउपस्थित होते मेळावा यशस्वी होण्यासाठीश्री संताजी बहुउद्देशीय सेवा मंडळ आरमोरी ,सचिव देविदास नैताम, सह सचिव श्री तुळशीदास चिलबुले,कोषा अध्यक्ष विवेक घटूरकर,विजय सुपरे,सदाशिव भांडेकर ,विलास चिलबुले, दिलीप जवंजाळकर नेताजी बोडणे,श्री शंकर बवनकार, गंगाधर जुअरे,गजानन चिलंगे,रविंद्र सोमनकार,, सौ प्रतिभा सुरेश जुअरे,सौ हिराबाई कंबळी,सौ सुरेखा सदाशिव भांडेकर सुरेश जुअरे,सुरेश किरमे,संतोष मोटघरे, व सर्व तेली समाज बंधू आणि भागणिनी मोठ्यसंख्याने उपस्थित होते प्रस्ताविक श्री द्वारकाप्रसाद सातपुते यांनी केले तर संचालन प्रा.प्रदीप चापडे सर आभार प्रदर्शन आकाश चिलबुले यांनी मानले Rashtriytelisamaj.com News

News